कासेगाव : कोल्हापूर-पुणे महामार्गावर कासेगावजवळ दुचाकीचा अपघात होऊन वाळवा तालुक्यातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मनिष मनोज मगदुम (रा. वाळवा, ता. वाळवा, जि. सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 मार्च रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुण मित्रासह दुचाकीवरून कराडच्या दिशेने जात होता. यावेळी वाहन चालवताना खिशातून रुमाल काढण्याच्या प्रयत्नात त्याचा वाहनावरील ताबा सुटला.
त्यानंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या ड्रेनेजच्या भिंतीवर आदळून अपघात झाला. या अपघातात दोघेही जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, उपचारादरम्यान मनिष मगदुम यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित अपघाताची कासेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात; फेब्रुवारीचा हफ्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू.
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी










