वाळवा : घरासमोर लॉक करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना वाळवा तालुक्यात घडली आहे.
अमन सुरज मुल्ला (वय 19, रा. चांदोली वसाहत, वाळवा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या आईच्या नावावर असलेली हिरो स्प्लेंडर प्लस (MH-10-EP-4875) ही दुचाकी घरासमोर उभी केली होती.
19 मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकी घरासमोर असल्याचे त्यांनी पाहिले. मात्र 20 मार्च रोजी पहाटे 5 वाजता उठून पाहिले असता ती दुचाकी तेथून गायब झाल्याचे निदर्शनास आले.
यानंतर त्यांनी कुटुंबीयांसह परिसरात व शेजारील गावांमध्ये शोध घेतला, मात्र दुचाकी मिळून आली नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरी केल्याची खात्री झाली.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: जतमध्ये डेप्युटी सरपंचावर हल्ला; लोखंडी गज, हातोड्याने मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










