जत : गावातील वीज तक्रारीच्या कारणावरून डेप्युटी सरपंचावर लोखंडी गज व हातोड्याने हल्ला झाल्याची घटना जत तालुक्यातील आवंढी येथे घडली आहे.
अमोल माणिक पाटील (वय 34) हे डेप्युटी सरपंच असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील घरगुती वीज तक्रारीबाबत ते वायरमन पंकज भाऊसो चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करत होते. याच कारणावरून पंकज भाऊसो चव्हाण यांच्याशी त्यांचा एक वर्षांपूर्वी वाद झाला होता.
22 मार्च रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अमोल पाटील हे आवंढी गावातील एका दुकानाजवळ थांबले होते त्यावेळी इनोव्हा गाडीतून पंकज भाऊसो चव्हाण, नवनाथ विठ्ठल चव्हाण व सचिन महादेव चव्हाण हे तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करत अमोल पाटील यांना मारहान केली.
यावेळी पंकज चव्हाण याने लोखंडी गजाने मारहाण केली, तर नवनाथ चव्हाण याने हातोड्याने डोळ्याजवळ मारून जखमी केले. सचिन चव्हाण याने केबल वायर व लाथाबुक्यांनी अमोल पाटील यांना मारहाण केली. त्यानंतर उपस्थितांनी भांडण सोडवले.
मारहाण करून जाताना संबंधितांसोबत भाऊसो हरिबा चव्हाण यांनीही अमोल पाटील यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. जखमी अमोल पाटील यांच्यावर ग्रामीण रुग्णालय जत येथे उपचार करण्यात आले.
या प्रकरणी पंकज भाऊसो चव्हाण, नवनाथ विठ्ठल चव्हाण, सचिन महादेव चव्हाण व भाऊसो हरिबा चव्हाण (सर्व रा. आवंढी, ता. जत) यांच्याविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: वाळव्यात मुलाला दगड का मारला विचारायला गेलेल्या वडिलांवर कोयत्याने हल्ला.
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी










