वाळवा : मुलाला दगड का मारला, याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या वडिलांवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना वाळवा तालुक्यातील भवानीनगर येथे घडली आहे.
बाळासो आण्णा पवार (वय 42) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या अनिल बाबासो पवार याच्याशी नारळाच्या झाडाच्या फांद्यांवरून त्यांचा पूर्वीपासून किरकोळ वाद सुरू होता.
22 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार यांचा मुलगा दूध आणण्यासाठी जात असताना अनिल बाबासो पवार यांनी त्याला दगड मारल्याचा प्रकार घडला. ही बाब लक्षात आल्यानंतर तक्रारदार त्याच्याकडे जाऊन विचारणा करू लागले.
यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि अनिल पवार यांनी कोयत्याने तक्रारदारांच्या डोक्यात वार करून त्यांना जखमी केले. जखमी अवस्थेत त्यांच्यावर भवानीनगर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले.
या प्रकरणी अनिल बाबासो पवार याच्याविरुद्ध ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: मिरजमधील ‘या’ भागांत दोन दिवस पाणीपुरवठा बंद.
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी










