सांगली : जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवणे हे मोठे आव्हान बनले असून यासाठी तातडीने जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत.
‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ योजनेअंतर्गत झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत त्यांनी आरोग्य विभाग आणि महिला व बालविकास विभागाला समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्ह्यात माता मृत्यू दर आटोक्यात येत असला तरी अर्भक मृत्यू दर आणि मुलींचा जन्मदर ही गंभीर समस्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजात लिंग समानतेबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यावर भर देण्यात येणार आहे.
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते. याची व्यापक प्रसिद्धी करावी तसेच सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी करून बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
यासोबतच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स तसेच शाळा-गाव पातळीवर जनजागृती वाढवून मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
हेही वाचा: वाळव्यात घरासमोर लावलेली दुचाकी चोरीस; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










