कवठेमहांकाळ : नागज-भिवघाट रोडवर रायवाडी फाट्याजवळ दाम्पत्यावर हल्ला करून मारहाण करत 1.20 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत रघुनाथ बिरू खरात (रा. रायवाडी. ता.कवठेमहांकाळ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 27 मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रघुनाथ खरात व त्यांच्या पत्नी शांताबाई हे दुचाकीवरून घरी जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचा रस्ता अडवला व दोघांनी त्यांना काठीने मारहाण केली.
यानंतर अज्ञात इसमांनी शांताबाई यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे गंठन व एक तोळ्याची भोरमाळ असा सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून नेला.
जखमी दाम्पत्यावर प्रथम नागज येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी मिरज येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले.
या प्रकरणी दोन अज्ञात इसमांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: कोयत्याचा धाक; तरुणांकडून दहशत निर्माण करत कॅफेत लूट.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










