कवठेमहांकाळ : रत्नागिरी–नागपूर महामार्गावर शिरढोण गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील दांपत्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, वॅगन आर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की कारचा समोरील भाग पूर्णपणे चिरडला गेला.
या अपघातात कारमधील संतोष गायकवाड आणि वंदना गायकवाड (रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले, स्थानिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढण्यात आले. अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
हेही वाचा: पासपोर्टसाठी जाणाऱ्यांनी लक्ष द्या; पुण्यातील केंद्र 30 मार्चपासून नव्या ठिकाणी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










