सांगली : ईश्वरपूर ते सांगली मार्गावर गोटखिंडी फाटा परिसरात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले असून धडक देणारा चारचाकी चालक फरार झाल्याची घटना घडली आहे.
तक्रारदार रशिद मगदुम (वय 68) रा. ख्वाजा सह्याद्री नगर, सांगली यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांची पत्नी कामेरी येथून परत येत असताना सायंकाळी सुमारे 5 वाजता हॉटेल यशवंतजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या वॅगनआर कारने जोरदार धडक दिली.
या धडकेत ते दोघेही रस्त्यावर पडून अंदाजे 20 फूट फरपटत गेले. यात रशिद मगदुम यांना डोके, खांदा व हाताला दुखापत झाली असून त्यांच्या पत्नीलाही मार लागला आहे.
अपघातानंतर संबंधित वाहनचालक न थांबता घटनास्थळावरून निघून गेला. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: शिरढोणजवळ भीषण अपघात; कोल्हापूरच्या दांपत्याचा जागीच मृत्यू.
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी










