कवठेमहांकाळ : तालुक्यातील अलकुड एम येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी डिजिटल आयडेंटिटी प्रणालीचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. या प्रणालीमुळे विद्यार्थी शाळेत आल्यावर आणि शाळा सुटल्यानंतर पालकांना मोबाईलवर त्वरित संदेश जातो.
विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ओळखपत्रावर स्कॅनर लावण्यात आले आहे. शिक्षकांकडून सकाळी उपस्थितीवेळी स्कॅन केल्यानंतर संबंधित पालकांना विद्यार्थी शाळेत पोहोचल्याचा संदेश जातो. तसेच शाळा सुटल्यानंतर पुन्हा स्कॅनिंग केल्यावर विद्यार्थी शाळेतून घरी निघाल्याची माहिती पालकांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे जाते.
शाळा प्रशासनाच्या मते, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालक व शिक्षकांची चिंता कमी करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. अलकुड एम येथील अंगणवाडीतही अशाच प्रकारचा प्रयोग सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
डिजिटल आयडेंटिटी प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद अधिक अचूक होत असून, पालकांना त्यांची मुलं शाळेत पोहोचल्याची आणि शाळेतून घरी निघाल्याची थेट मोबाइलवर माहिती मिळत असल्याने पालकांमधून या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा: 28 फेब्रुवारीपर्यंत कर भरा, नाहीतर वेतन थांबणार; आयुक्तांचा मनपा कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










