सांगली : महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःच्या किंवा कुटुंबीयांच्या नावे असलेल्या मालमत्तेची घरपट्टी व पाणीपट्टी वेळेत भरावी, अन्यथा वेतन रोखण्यात येईल, असा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांनी परिपत्रकाद्वारे दिला आहे.
कर भरल्याची पावती व स्वयंघोषणापत्र 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित कागदपत्रे सादर केल्यानंतरच वेतन मंजूर करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेच्या महसुलासाठी घरपट्टी व पाणीपट्टी हे प्रमुख उत्पन्न स्रोत असून, आर्थिक शिस्त राखण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वतः नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात नमूद आहे.
दरम्यान, शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीची एकूण रक्कम किती आहे, तसेच वसुलीची सध्याची टक्केवारी काय आहे, याकडेही लक्ष वेधले जात आहे. या निर्णयामुळे कर वसुलीबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट झाली आहे.
मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: सात-बाऱ्यासाठी 15 हजारांची मागणी; शिरगावात 10 हजार घेताना रंगेहात पकडले.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










