सांगली : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत ‘उमेद’ जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने स्वयं सहाय्यता समूहातील महिलांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री मेळावा ‘कृष्णाई मिनी सरस 2026’ या नावाने सांगलीत आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा 24 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान विश्रामबाग येथील कल्पद्रुम मैदानावर दररोज सकाळी 10 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत खुला राहणार असून प्रवेश विनामूल्य आहे.
प्रदर्शनात ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, मसाले, हस्तकला व ग्रामीण कलाकुसरीची विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
स्वयं सहाय्यता समूहातील महिलांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांची उत्पादने मध्यस्थांशिवाय ग्राहकांपर्यंत पोहोचविणे आणि स्थानिक अर्थचक्राला चालना देणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा: मुलं शाळेत पोहोचली की नाही? कवठेमहांकाळ तालुक्यातील झेडपी शाळेत डिजिटल आयडेंटिटीचा प्रयोग.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










