सांगली : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया 23 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत निधी जमा होणार आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी बँक खाते व आधार संलग्नता तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत नियमित हप्ता वितरण सुरू ठेवण्याचा शासनाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अनेक ठिकाणी लाभार्थ्यांकडून हप्ता उशिरा जमा होणे, आधार-खाते संलग्नतेतील तांत्रिक अडचणी अशा तक्रारी येत असल्याने निधी वेळेत जमा न झाल्यास संबंधित महिलांनी 181 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
हेही वाचा: 24 फेब्रुवारीपासून सांगलीत ‘कृष्णाई मिनी सरस 2026’; ग्रामीण महिलांच्या उत्पादनांचा पाच दिवसीय मेळावा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










