Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगली-मिरज-कुपवाड महापालिका मतदार यादीत नाव शोधण्याची अधिकृत वेबसाइटवरील प्रक्रिया दर्शवणारे प्रातिनिधिक छायाचित्र – फोटो : Sangli Today

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदारांना आपले नाव मतदार यादीत आहे की नाही तसेच मतदान कोणत्या बूथवर करायचे याबाबत संभ्रम असतो. मात्र, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही माहिती काही मिनिटांत तपासता येते.

घरबसल्या मतदार यादीत  आपले नाव, भाग क्रमांक (Part Number), मतदान केंद्र (Booth Number) आणि मतदान केंद्राचा पत्ता तपासण्यासाठी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा.

मतदार यादीत नाव व मतदान बूथ शोधण्याची पद्धत

  1. सर्वप्रथम https://mahasecvoterlist.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. Home page वर Search Name in Voter List या पर्यायावर क्लिक करा.
  3. नवीन पेज उघडल्यानंतर Search Your Name By मध्ये Name Wise हा पर्याय निवडा.
  4. Select Local Body मध्ये Municipal Corporations निवडा.
  5. Select District मध्ये तुमचा जिल्हा (आपला जिल्हा. Sangli) निवडा.
  6. Select Local Body Name मध्ये Sangli Miraj Kupwad Corporation निवडा.
  7. Full Name मध्ये तुमचे पूर्ण नाव (स्वतःचे-मधले नाव-आडनावासह) भरा.
  8. Search बटणावर क्लिक करा.

शोधानंतर कोणती माहिती दिसते?

शोध पूर्ण झाल्यानंतर संबंधित मतदाराचे नाव, वय, EPIC क्रमांक, भाग क्रमांक (Part Number), मतदान केंद्र क्रमांक (Booth Number) तसेच मतदान केंद्राचा संपूर्ण पत्ता स्क्रीनवर दिसेल.

ही माहिती निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्र शोधण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

मतदारांनी निवडणुकीच्या दिवशी अडचण टाळण्यासाठी आताच आपली माहिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: सांगलीत FDA ची मोठी कारवाई; ₹1.23 कोटींचा प्रतिबंधित तंबाखू-पानमसाला जप्त, 12 आरोपींवर गुन्हे.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा