NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Islampur Ishwarpur Neet Paper Leak Student Protest July 2026

ईश्वरपूर: NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ ईश्वरपूर येथे विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी निषेध मोर्चा काढत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नसल्याचा इशारा दिला.

दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा आणि जंतर-मंतर येथे आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ पंचायत समिती परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघालेला मोर्चा झरीनाका, आझाद चौक, गांधी चौक आणि यल्लमा चौक मार्गे तहसील कार्यालयात पोहोचला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी, शिक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागणे ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याचे सांगत परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्याची मागणी केली. तसेच NEET पेपरफुटीप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान काही वक्त्यांनी केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर टीका केली. विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर आपली भूमिका मांडली.

या आंदोलनात विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असून परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा