सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Sangli MLA Sudhir Gadgil Car Accident

सांगली: सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा शनिवारी दुपारी मिरज तालुक्यातील वड्डीजवळ अपघात झाला. दुचाकीस्वाराने अचानक यू-टर्न घेतल्याने झालेल्या धडकेत मोटारीधील एअरबॅग तात्काळ उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात आमदार गाडगीळ यांच्या हाताच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली असून दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सुधीर गाडगीळ कर्नाटकातील उगार येथून सांगलीकडे परत येत होते. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वड्डी ते कृष्णा घाट सर्व्हीस रस्त्यावर एका दुचाकीस्वाराने अचानक यू-टर्न घेतल्याने चालकाने दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकी मोटारीला धडकली.

धडकेची तीव्रता मोठी असल्याने मोटारीमधील एअरबॅग तात्काळ उघडल्या. त्यामुळे मोटारीधील सर्वजण सुरक्षित बचावले. आमदार गाडगीळ यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यासोबत असलेले स्वीय सहायक, अंगरक्षक, छायाचित्रकार आणि चालक यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक उपचारानंतर आमदार सुधीर गाडगीळ आपल्या निवासस्थानी परतले.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा