जत : जत तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणी पीडित अल्पवयीन विवाहितेच्या तक्रारीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याची माहिती असूनही आई-वडील, सासू-सासरे आणि भटजी यांनी संगनमताने तिचा विवाह राहुल पांडुरंग गेजगे याच्याशी लावून दिल्याचा आरोप आहे. विवाहानंतर पतीकडून शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याने पीडिता गर्भवती राहिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पती राहुल पांडुरंग गेजगे याच्यासह मुलीची आई ताई समाधान पारसे, वडील समाधान कुंडलिक पारसे, सासू रुक्मिणी पांडुरंग गेजगे, सासरा पांडुरंग शंकर गेजगे आणि विवाह लावून देणारा भटजी अर्जुन गुरव यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा व संबंधित गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीचे वय माहीत असतानाही विवाह लावून देण्यात आल्याने हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, संबंधित सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
- सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीचे बियाणे १००% मोफत; १८ हजार मिनिकीटचे वाटप, महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन
- Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार! शासनाकडून ३४४ कोटींचा विशेष निधी मंजूर; खात्यात कधी जमा होणार ₹१,५००?
- Gold Rate Today: धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या भावात नरमाई; खरेदीपूर्वी पाहा पीएनजीचे आजचे २२K आणि २४K चे ताजे दर (२८ ऑक्टोबर २०२६)
- Ladki Bahin Yojana: हप्ते बंद झालेल्या महिलांना ₹४०,००० मिळणार? इन्स्टाग्रामवरील ‘त्या’ व्हायरल दाव्याचे सत्य समोर; शासनाने जारी केला सतर्कतेचा इशारा
- Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांची दिवाळी गोड! ३०४ तालुक्यांतील दीड कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ५,००० रुपये थेट खात्यात; राज्य सरकारचा ७,५०० कोटींचा निर्णय, GR जारी
- Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात ‘अर्णब’ चक्रीवादळाचे थैमान; गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडणार का?









