Ladki Bahin Yojana | सांगली : महाराष्ट्र सरकारच्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा समोर आला आहे. गरीब व गरजू महिलांसाठी असलेल्या या योजनेत सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि निवृत्त महिला लाभार्थी म्हणून सामील झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
तपासात मोठा गैरप्रकार
महिला व बालकल्याण विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने केलेल्या तपासात 8 हजारांहून अधिक बोगस लाभार्थींची यादी तयार झाली आहे. नियमांनुसार वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांना मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र, नियमांकडे दुर्लक्ष करून सक्षम महिलांनीही अर्ज दाखल करून निधी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रामाणिक महिलांवर अन्याय
या गैरव्यवहारामुळे खर्या अर्थाने मदतीस पात्र असलेल्या अनेक महिलांना अन्याय सहन करावा लागत आहे. योजनेंतर्गत मिळणाऱ्या निधीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका होत आहे.
कारवाईची अपेक्षा
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई होणार आहे. शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेत विश्वास टिकवण्यासाठी पारदर्शकता आणणे आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.
हेही वाचा: MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण.