सांगली टुडे वृत्तसेवा | विशेष राजकीय व प्रशासकीय प्रतिनिधी: राज्यातील कोट्यवधी महिलांचे लक्ष लागून राहिलेल्या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत सध्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत. ऐन दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या काळात घरखर्चाचे नियोजन करण्यासाठी लाभार्थी भगिनींना सप्टेंबरच्या प्रलंबित हप्त्याची प्रतीक्षा आहे. त्यातच एका बाजूला हप्ता कधी जमा होणार आणि दोन महिन्यांचे मिळून ३,००० रुपये मिळणार का, याची चर्चा रंगत असताना; दुसऱ्या बाजूला मात्र ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेमुळे महिला अचानक अपात्र ठरल्याने संतापाची मोठी लाट उसळली आहे.
सर्वात विशेष बाब म्हणजे, या तांत्रिक अडचणींची तक्रार नोंदवण्यासाठी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर देण्यात आलेली ‘त्रुटी नोंदवा’ ही मुख्य लिंकच गायब असल्याचे समोर आले आहे.
दिवाळीपूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे ३,००० रुपये एकत्र जमा होणार?
ऑक्टोबर महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरू झाला तरी सप्टेंबरच्या हप्त्याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. यापूर्वी जुलैचा हप्ता २८ ऑगस्टच्या सुमारास, तर ऑगस्टचा हप्ता २७ सप्टेंबरनंतर खात्यात वर्ग करण्यात आला होता.
सध्याच्या सूत्रांनुसार, आगामी दिवाळी सण लक्षात घेता २५ ऑक्टोबरनंतर लाभ हस्तांतरण (DBT) सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर पडला, तर दिवाळीची भेट म्हणून सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्र ₹३,०००/- महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील का, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहेत.
मोठा घोळ: अधिकृत पोर्टलवरील ‘त्रुटी नोंदवा’ लिंकच बंद!
हप्ता जमा होण्याच्या चर्चेदरम्यान ज्या महिलांचे अर्ज तांत्रिक अडचणींमुळे अडकले आहेत, त्यांच्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत शासकीय पोर्टलवर उजव्या कोपऱ्यात तक्रारीसाठी ‘त्रुटी नोंदवा’ असा पर्याय देण्यात आला आहे.
मात्र, लाभार्थी महिलांनी या पर्यायावर क्लिक केले असता कोणतीही तक्रार नोंदणी प्रणाली उघडत नसून, थेट गुगल ड्राइव्हचा एरर दाखवला जात आहे. त्यावर “Sorry, the file you have requested does not exist” असा मेसेज दिसत आहे. प्रशासकीय पातळीवरून हा तक्रार अर्ज काढून घेण्यात आल्याने किंवा चुकीची लिंक जोडल्याने, ज्या महिलांचे अनुदान बंद झाले आहे त्यांना ऑनलाइन दाद मागण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नाही.
ई-केवायसीमुळे लाभार्थी संख्येत घट; महिला रस्त्यावर, २१०० रुपयांची मागणी
अलीकडेच झालेल्या ई-केवायसी (e-KYC) पडताळणी प्रक्रियेनंतर कागदपत्रांतील त्रुटी, बँक खात्याशी आधार संलग्न नसणे किंवा वयाच्या अटींमुळे अनेक गृहिणी, शेतमजूर आणि कष्टकरी महिलांचे अनुदान अचानक बंद झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
पात्र असतानाही विनाकारण अपात्र केल्याचा आरोप करत अहमदनगरमधील अकोले येथे तहसील कार्यालयावर महिलांचा मोर्चा धडकला. किसान सभेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिलांनी आक्रमक पवित्रा घेत खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
- अपात्र ठरलेल्या गरजू महिलांसाठी केवायसी प्रक्रिया पुन्हा खुली करून तातडीने अनुदान सुरू करावे.
- सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हप्ते दिवाळीआधी बँक खात्यात वर्ग करावेत.
- महिलांना दरमहा १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देण्याच्या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी व्हावी.
ऑनलाइन तक्रार लिंक बंद असताना महिलांनी काय करावे?
जोपर्यंत संकेतस्थळावरील तांत्रिक अडचण दूर होत नाही, तोपर्यंत महिलांनी खालील पर्यायांचा वापर करून आपल्या अर्जाची स्थिती तपासावी:
| तक्रार व मदतीचा मार्ग | प्रक्रिया | कोणासाठी उपयुक्त? |
|---|---|---|
| १. अधिकृत टोल-फ्री क्रमांक | शासनाच्या १८१ या क्रमांकावर कॉल करावा. | अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी. |
| २. आपले सरकार / सेतू केंद्र | बँक खात्याची DBT स्थिती व आधार सीडिंग तपासून घ्यावे. | कागदपत्र पडताळणी. |
| ३. तालुका CDPO कार्यालय | पंचायत समितीमधील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज द्यावा. | अपात्र ठरवले गेले असल्यास. |
हे ही वाचा: LPG Gas: गॅस सिलिंडर बुक करूनही आला नाही? सिस्टीममधून बुकिंग आपोआप रद्द; याद्या जाहीर, दिवाळीआधी करा हे काम.
📢 लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे अधिकृत अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी WhatsApp Channel फॉलो करा.




