सांगली: सांगली महापालिकेच्या ताफ्यात ४ ‘फायर बुलेट’ दाखल; अरुंद गल्लीबोळांतील आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवणे होणार सोपे

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या अग्निशमन विभागाला शासनाकडून ४ फायर बुलेट वाहने मिळाली.

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या अग्निशमन सेवेच्या बळकटीकरणासाठी शासनाकडून चार अत्याधुनिक ‘फायर बुलेट’ वाहने प्राप्त झाली आहेत. महापालिका आयुक्त संजीता महापात्रा यांच्या हस्ते या चारही वाहनांचे विधिवत पूजन करून ती अग्निशमन विभागाकडे सोपवण्यात आली. या वाहनांमुळे शहरातील अरुंद रस्ते आणि गल्लीबोळांमध्ये लागणाऱ्या आगीवर तातडीने नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या धोरणानुसार अग्निशमन सेवांचे सक्षमीकरण करण्यासाठी ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महापालिका मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांच्यासह अग्निशमन विभागातील व महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अरुंद गल्लीबोळांतील आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवणे होणार सोपे

सांगली आणि मिरज शहरांमधील अरुंद गल्ल्या, दाट वस्तीच्या भागातील अरुंद रस्त्यांवर मोठी अग्निशामक वाहने वेळेत पोहोचणे कठीण होते. अशा ठिकाणी ही ‘फायर बुलेट’ वाहने ‘फर्स्ट रिस्पॉन्डर’ (First Responder) म्हणून अत्यंत जलद गतीने पोहोचू शकणार आहेत. लहान स्वरूपाची आग, डीपी (विद्युत ट्रान्सफॉर्मर), दुचाकी व चारचाकी वाहनांना लागलेली आग यांवर प्राथमिक स्तरावर नियंत्रण मिळवण्यासाठी या दुचाकींचा मोठा फायदा होणार आहे.

शासनाकडून मिळालेल्या या चार नवीन वाहनांमुळे महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेची क्षमता वाढली असून, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेला अधिक बळकटी मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा: LPG Gas: गॅस सिलिंडर बुक करूनही आला नाही? सिस्टीममधून बुकिंग आपोआप रद्द; याद्या जाहीर, दिवाळीआधी करा हे काम.

वाचा: आमदार गोपीचंद पडळकर यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; कोल्हापूर सर्किट बेंचचा आदेश रद्द, उमेदवारी अर्ज ठरवला वैध.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा