Sangli Culture : सांगलीत 11 जानेवारीला भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव; कथ्थक, शास्त्रीय गायन व तालवादनाचा सुरेल संगम

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
प्रातिनिधिक छायाचित्र – Sangli Today

सांगली : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि स्वरवसंत ट्रस्ट, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव रविवार, 11 जानेवारी रोजी सांगलीत आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 3 ते रात्री 10 या वेळेत भावे नाट्यमंदिर येथे हा महोत्सव रंगणार असून, शास्त्रीय संगीत, कथ्थक नृत्य आणि तालवादनाचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे.

या महोत्सवाची सुरुवात पुणे येथील धनश्री नातू-पोतदार व सहकलाकारांच्या कथ्थक नृत्य सादरीकरणाने होणार आहे. या सादरीकरणासाठी डॉ. आसावरी पाटणकर (पढंत), समीर पुणतांबेकर (तबला), मनोज देसाई (गायन व संवादिनी) आणि गणेश फपाळ (पखवाज) यांची साथ लाभणार आहे.

यानंतर गोवा येथील सुप्रसिद्ध संवादिनी वादक पं. राया कोरगावकर यांना पं. वसंत-नाथबुवा गुरव, ज्येष्ठ संवादिनी वादक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुढील सत्रात बनारस घराण्याचे दिग्गज पद्मभूषण पं. राजन मिश्रा व पं. साजन मिश्रा यांचे शिष्य डॉ. प्रभाकर कश्यप आणि डॉ. दिवाकर कश्यप या बंधूंचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना पं. रामदास पळसुले (तबला) आणि मिलिंद कुलकर्णी (संवादिनी) यांची साथ असणार आहे.

महोत्सवाची सांगता जागतिक कीर्तीचे तालसम्राट उस्ताद तौफिक कुरेशी यांच्या जेंबे वादनाने होणार आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांचे बंधू असलेले तौफिक कुरेशी यांनी तालवादन क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, त्यांचे सादरीकरण हा महोत्सवाचा विशेष आकर्षणबिंदू ठरणार आहे.

या कार्यक्रमाचे निवेदन पुणे येथील प्राजक्ता कुलकर्णी आणि सांगलीचे विजय कडणे करणार असून, ध्वनी व्यवस्था राजू सुपेकर यांची आहे. महोत्सवाचे उद्घाटन रविवारी दुपारी 3 वाजता दीपक केळकर महाराज यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोफत प्रवेशिका उपलब्ध असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

हेही वाचा: बेंगळुरू–लोकमान्य टिळक एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाची मंजुरी; मात्र सेवा अजून सुरू नाही, प्रवाशांमध्ये नाराजी.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा