सांगली : राज्यात सुमारे 2000 नवीन सार्वजनिक ग्रंथालयांना मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू असून ग्रंथालय व्यवस्थेतील वर्गीकरण पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
सांगली येथे आयोजित दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव-2025’ च्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात काही वर्षांपासून नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्यावर मर्यादा होत्या. त्यामध्ये सुधारणा करून नव्या ग्रंथालयांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबतही शासनस्तरावर सकारात्मक विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ग्रंथालयांसाठी पुस्तके खरेदी, कपाटे, फर्निचर यासाठी विविध योजनांद्वारे निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समिती तसेच खासदार-आमदार निधीतूनही मदत देता येणार असल्याची माहिती देण्यात आली.
सांगली जिल्ह्यात शंभर वर्षांहून अधिक काळापासून सुरु असलेली अनेक जुनी ग्रंथालये आहेत. अशा ग्रंथालयांनाही बळकटी देण्याची शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दोन दिवसीय ग्रंथोत्सवात विविध पुस्तक स्टॉल, चर्चासत्रे आणि कथाकथन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रंथपाल आणि वाचकांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमास साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: आटपाडीत दुकानफोडी; दिघंचीतील इलेक्ट्रिकल दुकान फोडून 70 हजारांचा माल लंपास.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










