आटपाडीच्या ‘फुला’ चित्रपटाचा टीजर रिलीज; सुबोध भावे यांच्या आवाजामुळे वाढली उत्सुकता

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
‘फुला’ चित्रपटाचा टीजर रिलीज.

सांगली : जिल्ह्यातील आटपाडी येथील तरुणांनी तयार केलेल्या ‘फुला’ या मराठी चित्रपटाचा टीजर रिलीज झाला असून, सुबोध भावे यांच्या आवाजामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

वाघ्या-मुरळी परंपरेवर आधारित या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. “यत्र नार्यस्तू पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता” या संस्कृत ओळींनी सुरू होणाऱ्या टीजरमध्ये दाखवलेले दृश्य आणि पार्श्वभूमीमुळे चित्रपटाची वेगळी झलक समोर आली आहे.

‘फुला’ हा चित्रपट एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या मुलीच्या संघर्षाची कथा मांडतो. तमाशा फड, जागरण-गोंधळ आणि लोकसंस्कृतीच्या पार्श्वभूमीवर ही कथा उभी करण्यात आली आहे.

या चित्रपटाची निर्मिती अजित शिवाजी जाधव यांनी केली असून दिग्दर्शन अभिषेक जावीर यांचे आहे. संगीत दिग्दर्शन समाधान ऐवळे यांनी केले आहे. हा चित्रपट 17 एप्रिलपासून राज्यातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

‘फुला’ चित्रपटाचा टीजर

हेही वाचा: सांगलीत गॅस वितरणात बदल; आता OTP पडताळणीनंतरच मिळणार घरपोच सिलिंडर.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा