मिरज : म्हैसाळ येथे पोलिसांनी जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणारे वाहन पकडून कारवाई केली. या कारवाईत चार जर्शी गायी आणि एक देशी बैल घेऊन जाणारे टाटा योध्दा वाहन जप्त करण्यात आले.
डायल 112 वर मिळालेल्या माहितीनुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी म्हैसाळ ते कागवाड रोडवरील मच्छी मार्केट परिसरात जाऊन तपासणी केली. यावेळी टाटा योध्दा वाहनात जनावरे दाटीवाटीने बांधून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
वाहन चालक पांडुरंग हणमंत पाटील (वय 51, रा. कुप्पडगिरी, ता. खानापूर, जि. बेळगाव) याच्याकडे जनावरांच्या वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 तसेच मोटार वाहन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मिरज ग्रामीण पोलिस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा: नोकरी शोधणाऱ्या महिलांसाठी सुवर्णसंधी; सांगलीत 23 मार्चला 300 पेक्षा जास्त पदांसाठी मुलाखती.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










