Sangli News : 31 डिसेंबर व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कडक नाकाबंदी; पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : नाकाबंदी कारवाईदरम्यान सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे – सौजन्य : Sangli Police (Official)

सांगली : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तसेच सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे सांगली जिल्ह्यात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्हाभरात तसेच महापालिका हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी व वाहन तपासणी सुरू करण्यात आली असून, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वतः काही प्रमुख चौकांना भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली.

पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 डिसेंबरपासून महापालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्या अनुषंगाने सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांमध्ये स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम (SST) कार्यरत असून, जिल्ह्यातील प्रमुख प्रवेश मार्ग, चौक आणि संवेदनशील ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले आहे.

नवीन वर्षाच्या निमित्ताने नागरिक आणि युवक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. या काळात कुठेही बेकायदेशीर कृत्य, हुल्लडबाजी, मद्यधुंद वाहनचालना किंवा आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी पोलीस विभागाकडून ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. मोटार वाहन कायद्याचे नियम काटेकोरपणे राबवले जात असून, नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील एकूण 25 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी सुरू असून, सांगली आणि मिरज या उपविभागांतील सहा पोलीस हद्दींमध्ये विशेष दक्षता घेण्यात आली आहे. कोणीही अफवा पसरवत असल्यास किंवा कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन वर्षाचे स्वागत शांततेत, नियमांचे पालन करत आणि सुरक्षित वातावरणात करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले असून, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

हेही वाचा: सांगली एसटी आगाराला मिळाल्या 100 नव्या बसेस; मात्र बसटंचाईचा प्रश्न कायम.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा