आटपाडी : तालुक्यातील निंबवडे येथे पतीने पत्नीवर चारीत्र्याचा संशय घेत लाकडाने मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मंगल अंकुश वाघमारे (वय 32, मूळ रा. रायगड, सध्या निंबवडे, ता. आटपाडी) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश बाळु वाघमारे हा पत्नीवर चारीत्र्याचा संशय घेऊन तिच्यासोबत वारंवार भांडणे काढत होता. 19 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पुन्हा दोघांमध्ये वाद झाला.
या वादादरम्यान पतीने पत्नीच्या डोक्यावर आणि तोंडावर लाकडाने मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पती अंकुश वाघमारे याच्याविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: सांगलीत विवाहासाठी 20 हजारांची मदत; कुणाला मिळणार लाभ? जाणून घ्या.
- सांगलीत महिला रोजगार मेळावा; 300+ नोकऱ्या, फक्त 2 दिवस बाकी
- आटपाडी : निंबवडे येथे चरित्र्याच्या संशयावरून लाकडाने मारहाण करून पत्नीची हत्या; पतीविरुद्ध गुन्हा दाखल
- सांगलीत विवाहासाठी 20 हजारांची मदत; कुणाला मिळणार लाभ? जाणून घ्या
- सांगलीच्या ७ महिलांनी मिळवला दिल्लीत सन्मान; राष्ट्रीय मंचावर झळकली कामगिरी
- सांगलीत कंबरेला कोयता लावून फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात; गुन्हा दाखल
- विट्यात कोयता घेऊन दहशतीचा प्रयत्न; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल










