आटपाडी : तालुक्यातील दिघंची येथील बसस्थानकाजवळ असलेल्या संजय अँग्रो सेल्स या इलेक्ट्रिकल साहित्याच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 21 हजार 700 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
28 फेब्रुवारी रात्री 9 ते 1 मार्च सकाळी 6.53 या कालावधीत ही चोरी घडल्याचे पोलिसांत नोंद आहे.
दुकान मालक सुभाष रामचंद्र जरे (वय 45, रा. दिघंची) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 28 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या पुतण्याने फोन करून दुकानाचे शटर उचकटले असल्याची माहिती दिली. त्यानंतर जरे यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता शटर उचकटलेले असल्याचे दिसले.
दुकानात प्रवेश करून पाहिले असता कॉपर तार आणि विविध प्रकारच्या कॉपर केबल्स जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. तसेच दुकानातील ड्रॉवर उघडा असून त्यातील 5 हजार रुपये रोख रक्कमही गायब होती.
चोरीस गेलेल्या मालामध्ये सुमारे 45 किलो कॉपर तार, 2.5 एमएम आणि 4 एमएम कॉपर केबल, तसेच 2 कोअर कॉपर केबलचा समावेश आहे. रोख रकमेसह एकूण 1,21,700 रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची नोंद आहे.
आटपाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
गुन्हे विषयक आणखी बातम्या वाचा : Sangli Crime News In Marathi.
हेही वाचा: सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










