इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील रेठरेधरण येथील म्हसोबा मंदिराच्या माळावर बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी आलेल्या युवकाची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, आशुतोष प्रताप घाटगे (वय 25, रा. माणगाव, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) हे 1 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 4.30 वाजता आपल्या मित्रासह रेठरेधरण येथील म्हसोबा मंदिराच्या माळावर बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी आले होते.
त्यांनी आपली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल मैदानाच्या मागील बाजूस लॉक करून उभी केली होती. सायंकाळी सुमारे 7 वाजता शर्यत पाहून परत आले असता मोटारसायकल उभी केलेल्या ठिकाणी दिसून आली नाही.
यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला असता मोटारसायकल मिळून न आल्याने ती चोरीस गेल्याची खात्री झाली. चोरीस गेलेल्या मोटारसायकलची अंदाजे किंमत 20 हजार रुपये आहे.
इस्लामपूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
येथे वाचा: सांगली गुन्हे बातम्या.
हेही वाचा: दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










