सांगली : सोशल मीडियावर महानगरपालिकेत ‘कर्मचारी भरती’ संदर्भात फिरत असलेल्या जाहिराती आणि पोस्ट पूर्णपणे खोट्या असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
फेसबुक, इंस्टाग्राम तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगली महानगरपालिकेत भरती संदर्भात काही संदेश प्रसारित होत असून अनेक नागरिकांकडून फोनद्वारे भरती संदर्भात विचारणा करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, सध्या कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया सुरू नाही. अधिकृत भरतीबाबतची माहिती केवळ सांगली महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर शासकीय जाहिरातीद्वारे प्रसिद्ध केली जाते.
नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नये किंवा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा: होळीच्या रात्री पुणे–बेंगलोर महामार्गावर हिट अँड रन; पेठनाक्याजवळ 55 वर्षीय वेटरचा मृत्यू.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










