पेठनाका (ता. वाळवा) – होळीच्या सणाच्या रात्री पेठनाक्याजवळ पुणे–बेंगलोर महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत 55 वर्षीय वेटरचा मृत्यू झाल्याची घटना घडली. धडक दिल्यानंतर पांढऱ्या रंगाची चारचाकी कार घटनास्थळी न थांबता पुण्याच्या दिशेने सुसाट निघून गेली.
चंद्रकांत शिवाप्पा पांचाळ (वय 55, रा. पेठनाका) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते येडेनिपाणी येथे एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होते. होळीचा सण असल्याने सोमवारी (दि. 2 मार्च) रात्री सुमारे 8.15 वाजण्याच्या सुमारास ते कामावरून घरी परतत होते.
त्यावेळी पुणे–बेंगलोर महामार्गावर, हॉटेल मणिकंडनसमोर अचानक अपघाताचा मोठा आवाज झाला. आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. पांचाळ यांचे घरही तेथेच असल्याने त्यांच्या पत्नीही घटनास्थळी पोहोचल्या. रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेली व्यक्ती आपले पतीच असल्याचे त्यांनी ओळखले. त्यांच्या डोक्याला तसेच हाता-पायांना गंभीर दुखापत झाली होती.
स्थानिकांच्या मदतीने जखमी अवस्थेत पांचाळ यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, ईश्वरपूर येथे हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
पांढऱ्या रंगाच्या अज्ञात कारचालकाविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून संबंधित वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
चंद्रकांत पांचाळ यांच्या पश्चात पत्नी, 15 वर्षांची मुलगी आणि 8 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. कुटुंबाचा प्रमुख कमावता गमावल्याने घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
येथे वाचा : सांगली अपघात बातम्या.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










