सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; २ लाखांवरील कर्जमुक्तीसाठी ‘ओटीएस’ योजनेची ७,९४६ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर, पहा कुठे पाहता येणार यादी

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगली जिल्ह्यातील ७,९४६ शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीच्या ओटीएस योजनेची यादी जाहीर! तुमच नाव यादीत आहे का? जाणून घ्या कुठे तपासायच. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता (OTS) प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेची सांगली जिल्ह्यातील ७ हजार ९४६ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची २ लाखांवरील रक्कम बँकेत भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२७ पर्यंत राहणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

कुठे पाहता येणार यादी? 

शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात, पात्र शेतकऱ्यांनी २ लाखांवरील त्यांच्या हिश्श्याची रक्कम बँकेत भरल्यानंतर शासनाकडून २ लाख रुपयांचा कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातील पात्र ७,९४६ शेतकऱ्यांमध्ये जिल्हा बँकेचे ६,२६२ तर राष्ट्रीयकृत बँकांचे १,६८४ शेतकरी आहेत. ही लाभार्थी यादी शेतकऱ्यांना आपल्या गावातील ग्रामपंचायत, विकास संस्था आणि संबंधित बँकेच्या शाखेत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायासाठी ₹८.५१ लाखांपर्यंत सरकारी अनुदान; ५ दुधाळ गाई-म्हशींच्या योजनेसाठी २६ नोव्हेंबरपासून MahaDBT 2.0 वर अर्ज सुरू.

पैसे भरताना ‘ही’ महत्त्वाची काळजी घ्या 

प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, बँक कर्जखाते तपशील, ३१ मार्च २०२६ अखेरची थकबाकी, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आणि शासनाकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम स्पष्टपणे दिलेली आहे. शेतकऱ्यांनी हा तपशील तपासून आपल्या हिश्श्याची २ लाखांवरील रक्कम बँकेत भरायची आहे.

ज्या शेतकऱ्यांचे कर्जखाते एकाच बँकेत आहे, त्यांनी त्याच खात्यात पैसे भरावेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांची एकापेक्षा जास्त कर्जखाती आहेत, त्यांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम कोणत्याही एका कर्जखात्यात भरण्याची सोय देण्यात आली आहे. फक्त ओटीएस योजनेनुसार बँकेला देय असलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे खात्यात भरू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा: जमीन आणि घर खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; २ लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहार केल्यास थेट आयकर विभागाला माहिती जाणार, ‘आय-सरिता’ प्रणालीत मोठा बदल.

पैसे भरल्यानंतर पुढे काय करायचे? 

शेतकऱ्याने २ लाखांवरील रक्कम बँकेत भरल्यानंतर संबंधित बँक दर शुक्रवारी ही माहिती पोर्टलवर अपलोड करेल आणि शेतकऱ्याला कळवेल. माहिती अद्ययावत झाल्यानंतर तीन दिवसांनी शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची (Aadhaar Authentication) सुविधा सुरू होईल. योजनेच्या नियमानुसार ओटीपीद्वारे नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरच या कर्जमाफीचा लाभ जमा होणार आहे. यापुढील टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्याही प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

हेही वाचा: ६७.५ टीएमसी पाणी मुंबईला नेण्याआधी दुष्काळी सांगली-साताऱ्याची तहान भागवा; सांगलीसाठी २५ टीएमसी अतिरिक्त पाण्याची कायमस्वरूपी तरतूद करा” — आमदार सुहास बाबर यांची मागणी.

📢 कर्जमाफीच्या नवीन याद्या, कृषी योजना आणि सांगली जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी सांगली टुडे ला गुगल वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा. 👇

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा