Sangli News : पॉलिशच्या बहाण्याने वृद्ध महिलेकडून तीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एक आरोपी अटकेत, दोघे फरार

Sangli Today Desk
Sangli Today Desk
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व...
Sangli Gold Theft Polish Fraud

Kadegaon News Today | कडेगाव (सांगली) : मोहिते वडगाव येथे मंगळवारी दुपारी वृद्ध महिलेला फसवून तब्बल दोन लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून दोघे फरार आहेत.

सुलोचना भिकाजी मोहिते (वय ७०) घरी एकट्या असताना तिघेजण घरात आले. त्यांनी सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, असा बहाणा करत त्यांच्याकडील बांगड्या व पाटल्या मिळून ५६ ग्रॅम सोन्याचे दागिने घेतले. दागिन्यांना द्रवात टाकल्याचा आभास करून संशयितांनी बनावट धातूचे दागिने परत दिले आणि घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेनंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून दुर्गेश किसनकुमार गुप्ता (रा. म्हैसूर बाजार, जमालपूर, जि. खगडिया) याला रात्री उशिरा अटक केली. त्याचे साथीदार योगेश यादव व विकास सहा हे मात्र फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे आणि पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

🔴 हेही वाचा 👉 पोलीस ठाण्यात ताब्यातील आरोपीचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक.

Share This Article
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, नागरिक प्रश्न आणि तालुका स्तरावरील घडामोडींवर लक्ष केंद्रित करते. दररोजच्या स्थानिक घटनांचा आढावा घेऊन अचूक व विश्वासार्ह माहिती देणे हेच आमचे ध्येय आहे.