Sangli News : द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; खासदार विशाल पाटील सहभागी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा | फोटो : संकलन – Sangli Today

सांगली : द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. चीन व अफगाणिस्तानमधून होणाऱ्या बेदाणा तस्करीविरोधात कारवाई, आयात धोरणात बदल, कर्जमाफी आणि शेतमालाला रास्त दर मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

या मोर्चात सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य असून त्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खा. विशाल पाटील म्हणाले की, उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ, बाजारपेठेतील अस्थिरता, दलालांमुळे होणारी शेतमालाची लूट, निर्यातीतील अडचणी आणि आयात धोरणांमुळे द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. “शेतकऱ्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाला योग्य किंमत मिळाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
| फोटो : संकलन – Sangli Today

मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी चीनचा बेदाणा अफगाणिस्तानमार्गे बेकायदेशीररीत्या आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अफगाणिस्तानातून येणाऱ्या बेदाण्यावर आयात कर लावावा, द्राक्ष उत्पादकांना सरसकट कर्जमाफी द्यावी, चीनी द्राक्षांवर अँटी-डम्पिंग ड्युटी वाढवावी, तसेच शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांवर मोकासारखा कठोर कायदा लागू करावा, अशा मागण्या केल्या.

क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा परिसरातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला, जिथे शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. द्राक्ष व बेदाणा उत्पादकांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

हेही वाचा: मालगाव येथे लाईट कनेक्शनवरून भावकीत वाद; आठ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा