Sangli Culture : जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मोतीबागेत ‘कृष्णाकाठचा साहित्य मेळावा’; प्रा. डॉ. तारा भवाळकर यांचा सन्मान

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

सांगली : मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या निवासस्थानी ‘कृष्णाकाठचा साहित्य मेळावा : साहित्यिकांची मांदियाळी’ हा अनौपचारिक पण अर्थपूर्ण साहित्यिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. साहित्यिक, कवी आणि अभ्यासकांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याने सांगलीच्या साहित्यिक परंपरेला नवे बळ दिले.

या मेळाव्याचे केंद्रबिंदू ठरल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा प्रा. डॉ. तारा भवाळकर. मराठी साहित्यविश्वातील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगलीकरांच्या वतीने त्यांचा सन्मान केला. यावेळी प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी प्रशासनाच्या वातावरणात साहित्यिक उपक्रम घडत असल्याबद्दल आनंद व्यक्त करत, आपल्या साहित्यसाधनेतील अनुभव कथन केले तसेच काही कविता सादर केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले की, प्रा. डॉ. तारा भवाळकर यांच्या लेखनातून स्त्री-अनुभव, सामाजिक वास्तव आणि मानवी नातेसंबंध यांचे सूक्ष्म दर्शन घडते. मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

कार्यक्रमात मनोरमा साहित्य संमेलन, सोलापूर–२०२५ या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. तसेच रंगलेल्या काव्यमैफलीत ज्येष्ठ व नव्या पिढीतील अनेक कवींनी कविता सादर केल्या. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अशोक काकडे, त्यांच्या पत्नी शरदिनी काकडे आणि त्यांचे चिरंजीव यांनीही कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

या साहित्य मेळाव्यास उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, साहित्यिक, कवी, अभ्यासक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच या कार्यक्रमाने सांगली जिल्ह्याच्या साहित्यिक परंपरेला नवी चालना मिळाली.

हेही वाचा: विवाहितेचे अपहरण; घरात घुसून पती व नातेवाईकांना मारहाण.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा