Sangli: शिराळा तालुक्यात बिबट्याचा थरार, घरात घुसला, पाळीव प्राण्यांवर हल्ला

Sangli Today Desk
Sangli Today Desk
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व...
Sangli Leopard Attack Shirala September 2025

Sangli Leopard Attack News | सांगली: शिराळा तालुक्यातील बिऊर गावात एका रात्रीत दोन धक्कादायक घटना घडल्या. पहिल्या घटनेत पाळीव मांजराचा पाठलाग करत बिबट्या थेट घरात घुसला, तर दुसऱ्या ठिकाणी बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला उचलून नेले. या घटनांमुळे बिऊर परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किराणा व्यवसाय करणारे सखाराम पाटील बुधवारी रात्री दुकान बंद करून घरी परतले. घरात एकटे बसून टीव्ही पाहत असताना त्यांचे मांजर अचानक घरात धावत आले. काही क्षणातच एक मोठा प्राणी आत शिरला. सुरुवातीला त्यांना वाटले मांजरच आहे, पण गुरगुरण्याचा आवाज आल्यावर त्यांच्या लक्षात आले की घरात बिबट्या आला आहे. पाटील यांनी हालचाल करताच आवाज झाला आणि बिबट्या तत्काळ पळून गेला.

याच रात्री साडेआठच्या सुमारास गावातील पुजारी कुटुंब जेवण करत असताना बाहेरील खोलीत बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. क्षणातच कुत्र्याला तोंडात धरून तो अंधारात गायब झाला.

एकाच रात्री घडलेल्या या दोन घटनांनंतर बिऊर गावात भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: पालकमंत्र्यांनी घेतला सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील विकासकामांचा आढावा.

Share This Article
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, नागरिक प्रश्न आणि तालुका स्तरावरील घडामोडींवर लक्ष केंद्रित करते. दररोजच्या स्थानिक घटनांचा आढावा घेऊन अचूक व विश्वासार्ह माहिती देणे हेच आमचे ध्येय आहे.