सांगली : पलूस तालुक्यातील मोराळे गावातील 24 वर्षीय तरुणाचा रेल्वे पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान 1,600 मीटर धावताना मृत्यू झाल्याची दुःखद घटना शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलिस भरतीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस परेड मैदानावर शारीरिक चाचणी सुरू होती. धाव पूर्ण करण्याच्या काही क्षणांपूर्वी संबंधित तरुण अचानक कोसळला. उपस्थित वैद्यकीय पथकाने तत्काळ प्राथमिक उपचार करून त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
रेल्वे पोलिस दलात 93 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून शनिवारी 907 उमेदवारांची मैदानी चाचणी नियोजित होती. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भरती ठिकाणी वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका आणि आवश्यक सुविधा उपलब्ध होत्या.
अपघाती मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा : पाणी मागण्याचा बहाणा करून घरात प्रवेश; वांगीत 75 वर्षीय वृद्धेची बोरमाळ हिसकावणारे दाम्पत्य अटकेत, तीन गुन्हे उघड.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










