सांगली : पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर चार वंदे भारत गाड्यांचा थांबा असतानाही, सायंकाळी 4 ते 8 या वेळेत आरक्षण तिकीट काऊंटर बंद राहत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार समोर आली आहे.
‘Railway Pravasi Group’ या प्रवासी संघटनेने X (Twitter) वर ही बाब उपस्थित करत @RailwaySeva यांना टॅग करून तक्रार नोंदवली होती. यावर RailwaySeva या रेल्वेच्या अधिकृत खात्याने संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रकरण पाठवण्यात आल्याचे उत्तर दिले आहे.
किर्लोस्करवाडी हे सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक औद्योगिक नगर असून, प्रवासी व कामगारांची मोठी वर्दळ असलेले स्थानक आहे. वंदे भारतसारख्या गाड्यांचा थांबा असतानाही आरक्षण सुविधा मर्यादित वेळेत उपलब्ध असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून पुढील निर्णयाची प्रतीक्षा असून, आरक्षण काऊंटरची वेळ वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. या विषयावर रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत निर्णय किंवा वेळापत्रक जाहीर होणार का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: धार्मिक ठिकाणांचा प्रचारासाठी वापर टाळा; पोलिस प्रशासनाचा स्पष्ट इशारा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










