सांगली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सांगलीतील एका दांपत्याची 9 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुमित जाधव यांनी फिर्याद दिली असून गणेश जाधव (रा. जालना) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, संबंधित संशयिताने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत दुप्पट परतावा देण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार जुलै महिन्यात टप्प्याटप्प्याने रोख व बँक व्यवहारांद्वारे एकूण सुमारे 10 लाख रुपये घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र ठरलेल्या मुदतीत परतावा न मिळाल्याने संबंधित दांपत्याने रक्कम परत देण्याची मागणी केली.
त्यानंतर संशयिताने 1 लाख रुपये परत दिले, मात्र उर्वरित 9 लाख रुपये परत न केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: रेल्वे पोलिस भरतीदरम्यान 1,600 मीटर धावताना पलूस तालुक्यातील तरुणाचा मृत्यू.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










