मिरज : शहरात दोन लहान मुलांची पैशासाठी विक्री केल्याचा आणि नवजात बालिकेलाही विकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेसह पाच जणांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या 41 वर्षीय महिलेने आर्थिक अडचणींमुळे आपल्या दोन व तीन वर्षांच्या मुलांना प्रत्येकी सुमारे 20 हजार रुपयांना विकल्याचा आरोप आहे. तसेच पाच दिवसांच्या नवजात बालिकेचीही विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात मध्यस्थी केल्याच्या आरोपावरून उमाजी रमेश लोंढे व सुरेखा लोंढे यांच्यासह मुलांना ताब्यात घेतल्याचा आरोप असलेल्या दशरथ लोंढे आणि सचिन गोसावी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेचाही गुन्ह्यात समावेश आहे.
पोलिसांनी दोन्ही बालकांना ताब्यात घेऊन मिरजेत पाठक अनाथाश्रमात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास मिरज शहर पोलिसांकडून सुरू आहे.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










