नेर्ले (ता. वाळवा) : उसाच्या फडाला पाणी देत असताना एका शेतमजुरावर भरदिवसा बिबट्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. बंडा नेमिस्टे (रा. कापूसखेड) हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
माळीमळा परिसरात सुभाष माळी यांच्या शेतात काम करत असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाला. पाणी बंद करून नेमिस्टे शेतातून जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाठीमागून झेप घेत नेमिस्टे यांच्यावर हल्ला केला.
अचानक झालेल्या हल्ल्यात नेमिस्टे खाली पडले. बिबट्याशी झालेल्या झटापटीत त्यांचा शर्ट फाटला. आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या उसाच्या फडाच्या दिशेने पसार झाला.
भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने या भागात बिबट्यांचा वावर वाढल्याची चर्चा आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
हेही वाचा: सांगलीत विवाहितेवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










