सांगलीत ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात; अभिजात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते अभिजात मराठी साहित्य ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन.

सांगली : मराठी भाषा ही समृद्ध, गोड आणि आधुनिक काळाशी जुळवून घेणारी आहे. तिचा प्रसार आणि जतन करण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित अभिजात मराठी साहित्य ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात कुसुमाग्रजांचे साहित्य, विश्वकोश, शब्दकोश आणि विविध मराठी ग्रंथसंपदा मांडण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना केवळ राज्यस्तरीय परीक्षांपुरते मर्यादित न राहता यूपीएससी, एनडीए, सीडीएस, बँकिंग आदी राष्ट्रीय स्तरावरील संधींकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. मराठी भाषक तरुणांनी विविध क्षेत्रांत यश मिळवून भाषेचा गौरव वाढवावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी कुसुमाग्रज यांच्या साहित्य योगदानाचा उल्लेख करत मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. सांगलीतील महाविद्यालयांमध्ये कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन कार्यक्रमही पार पडले.

दरम्यान, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी सांगलीत ‘ग्रंथोत्सव २०२५’ आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: विठलापूर पंचायत समितीतील तृतीयपंथी सदस्य दिलीप हेगडे यांचे निधन; आटपाडीत शोककळा.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा