सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 16 जानेवारी 2026 रोजी मिरज येथील सेंट्रल वेअर हाऊस येथे पार पडलेली मतमोजणी प्रक्रिया शांततेत, शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात पूर्ण झाली.
मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी भारतीय सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 अंतर्गत मतमोजणी केंद्र परिसरात मनाई आदेश जारी केले होते. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी महसूल, पोलीस व निवडणूक प्रशासनाच्या समन्वयातून करण्यात आली.
मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात जमावबंदी, घोषणाबाजी, ध्वनिवर्धकांचा वापर, आक्षेपार्ह फलक, गुलाल किंवा रंग उधळण्यावर बंदी घालण्यात आली होती. तसेच समाजमाध्यमांद्वारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या मजकुरावरही प्रशासनाची विशेष नजर होती.
या सर्व उपाययोजनांमुळे मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. निकाल जाहीर होईपर्यंत संपूर्ण परिसरात शांतता आणि नियंत्रण राखले गेले.
दरम्यान, मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडल्याबद्दल नागरिकांकडून महसूल व पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.
हेही वाचा: जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मोतीबागेत ‘कृष्णाकाठचा साहित्य मेळावा’; प्रा. डॉ. तारा भवाळकर यांचा सन्मान.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









