Sangli Today | सांगली : सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या जयश्री मदन पाटील यांनी आपल्या गटातील इच्छुक उमेदवारांची तयारी पूर्ण केली आहे. महायुती आणि महाआघाडीचा अंतिम निर्णय 23 डिसेंबरनंतरच होणार असल्याने उमेदवारांना सध्या प्रतीक्षेतच राहावे लागणार आहे.
भाजपकडून महायुतीसाठी हालचाली सुरू असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घटक पक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर जयश्री पाटील यांनी आपल्या गटातील 25 इच्छुक उमेदवारांची यादी पक्षाकडे सादर केली आहे. या यादीत सहा विद्यमान नगरसेवकांचा समावेश असून, आगामी निवडणुकीत या गटाला योग्य प्रतिनिधित्व देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सादर करण्यात आलेल्या यादीत संतोष पाटील, रोहिणी पाटील, उत्तम साखळकर, गजानन मगदूम, प्रशांत जिनगोंडा पाटील, पद्मश्री प्रशांत पाटील, प्रकाश मुळके, संजय कांबळे, विद्या नलवडे, शशिकला अजित दोरकर, आनंदा लेंगरे, शीतल लोंढे, प्रतीक राजमाने यांच्यासह इतर नावांचा समावेश आहे.
महायुतीतील जागावाटप आणि उमेदवार निवडीबाबतचा अंतिम निर्णय 23 डिसेंबरनंतर होण्याची शक्यता असून, त्यानंतरच अधिकृत उमेदवार यादी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे भाजपसह सर्वच पक्षांतील इच्छुकांचे लक्ष पुढील काही दिवसांत होणाऱ्या निर्णयाकडे लागले आहे.
हेही वाचा: शिराळ्यात महायुतीचा विजय; पृथ्वीसिंग नाईक नगराध्यक्ष, चुरशीच्या लढतीत बहुमत मिळवले.
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत
- सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस









