Sangli Today | सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. विविध पक्ष व आघाड्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सत्ता मिळवत आपापली ताकद सिद्ध केली असून, नवनिर्वाचित नगराध्यक्षांची यादी समोर आली आहे.
उरुण ईश्वरपूर नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आनंदराव मलगुंडे नगराध्यक्ष झाले आहेत. पलूस नगरपरिषदेत काँग्रेसच्या संजिवनी पुदाले, तर जत नगरपरिषदेत भाजपचे रवींद्र आरळी विजयी झाले आहेत. विटा नगरपरिषदेत शिवसेनेच्या काजल मेत्रे यांना नगराध्यक्षपद मिळाले आहे.
आष्टा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे विशाल शिंदे, तर तासगाव नगरपरिषदेत स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया पाटील नगराध्यक्ष झाल्या आहेत. शिराळा नगरपंचायतीत शिवसेनेचे पृथ्वीसिंग नाईक, तर आटपाडी नगरपंचायतीत भाजपचे उत्तमराव जाधव नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
या निकालांमुळे सांगली जिल्ह्यात काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी तसेच स्थानिक आघाड्यांचे सामर्थ्य वेगवेगळ्या भागांत दिसून आले आहे. आगामी सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात असून, जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: महापालिकेसाठी भाजप नेत्या जयश्री पाटलांची तयारी पूर्ण; 25 जणांना उमेदवारीची मागणी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










