Sangli Today | सांगली : राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विविध सुविधा आणि उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रिया सुलभ, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक पार पाडता यावी, यासाठी महानगरपालिकेमार्फत स्वतंत्र ‘दिव्यांग मदत कक्ष’ स्थापन करण्यात आला असून, त्यासोबत विशेष हेल्पलाईन सेवाही सुरू करण्यात आली आहे.
दिव्यांग मदत कक्षामार्फत दिव्यांग मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती, मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या सुविधा (व्हीलचेअर, रॅम्प आदी), मतदान प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक किंवा प्रत्यक्ष अडचणींबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच मतदानाच्या दिवशी कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक पूर्वनियोजन व समन्वयही या कक्षामार्फत केला जाणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की हा मदत कक्ष सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत राहणार असून, दिव्यांग मतदारांच्या अडचणी तातडीने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.
मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक सहभाग वाढवणे आणि प्रत्येक मतदाराला कोणत्याही अडथळ्याविना मतदानाचा हक्क बजावता यावा, हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे मतदान केंद्रावरील सुविधा, मदत किंवा मार्गदर्शनासाठी दिव्यांग मतदारांनी या हेल्पलाईन सेवेचा अवश्य उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील सर्व दिव्यांग बांधवांनी या सुविधेचा लाभ घेऊन लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: दारूसाठी पैसे न दिल्याने युवकाचा खून; सीसीटीव्ही व तांत्रिक पुराव्यांवरून गुन्हा उघड, दोघांना अटक.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









