सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित शहरस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये महानगरपालिका शाळांतील १,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून, विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
महानगरपालिका आयुक्त श्री. सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षणासोबत खेळालाही समान महत्त्व देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या शहरस्तरीय क्रीडा स्पर्धांदरम्यान विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन, स्पर्धात्मक वृत्ती आणि खेळातील जोश दिसून आला. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सहभाग घेत आपली क्रीडा गुणवत्ता सादर केली.
क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो यांसारखे सांघिक खेळ, ५०, १०० व २०० मीटर धावणे, रिले शर्यती तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होईल असे मत व्यक्त करण्यात आले.
सांगली महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना क्रीडेमधून आपली क्षमता व्यक्त करण्याची संधी मिळाल्याने, या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि संघभावना निर्माण होत असल्याचे पाहायला मिळाले.
या शहरस्तरीय क्रीडा स्पर्धा दि. ३१ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या.
हेही वाचा: मैदानावर उतरली जिद्द; सांगलीत दिव्यांग खेळाडूंनी दाखवली आत्मविश्वासाची ताकद.
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत
- सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस









