सांगली : सांगली जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून श्री विशाल सविता तेजराव नरवाडे (IAS) रुजू झाले आहेत. याआधी धुळे जिल्ह्यात त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून गौरवण्यात आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला होता.
श्री. विशाल नरवाडे यांच्या कामकाजातील नाविन्यपूर्ण धोरणे, शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना दिलेली गती, तसेच विकासकामांमध्ये घेतलेले पुढाकार यामुळे त्यांची राज्यभर प्रशंसा झाली आहे. आता ते सांगली जिल्हा परिषदेचे नेतृत्व करणार असल्याने स्थानिक विकासकामांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सांगलीतील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले असून, पुढील काळात जिल्हा परिषदेच्या योजनांची अंमलबजावणी अधिक वेगाने होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा: सांगलीचे सीईओ श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे यांना ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार.

हेही वाचा: सीसीटीएनएस तपास प्रणालीत सांगली जिल्हा पोलिसांना राज्यात प्रथम क्रमांक.