सांगली : सांगली जिल्हा पोलीस भरती 2024-25 अंतर्गत पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या शारीरिक व मैदानी चाचणीत एकूण 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले असून त्यांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सांगली जिल्हा पोलीस दलाच्या https://www.sanglipolice.gov.in या संकेतस्थळावर संबंधित यादी उपलब्ध आहे. पात्र उमेदवारांनी आपली नावे तपासून पुढील प्रक्रियेसाठी तयारी ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय ही यादी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर तसेच पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावरही प्रसिद्ध करण्यात आली आहे, जेणेकरून उमेदवारांना प्रत्यक्ष पाहता येईल.
लेखी परीक्षेची दिनांक, वेळ आणि आवश्यक कागदपत्रांबाबतची माहिती महाआयटी विभाग, मुंबई यांच्याकडून पात्र उमेदवारांना एसएमएस व ई-मेलद्वारे कळविण्यात येणार असल्याचे सांगली पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची संपूर्ण यादी (PDF) पाहण्यासाठी येथे क्लिक करा: “Written Qualified Police Bharati 2024-25 PDF“
टीप : ही यादी सांगली जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
हेही वाचा: गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









