सांगली : समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांसाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सात राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2026 आहे.
सन 2024-25 व 2025-26 या वर्षांसाठी हे पुरस्कार प्रदान केले जाणार असून समाजोन्नती, समता आणि सामाजिक न्यायासाठी कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
या पुरस्कारांचा समावेश:
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
- पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार
- संत रविदास पुरस्कार
- लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार
- शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार
पात्रता:
पुरुष उमेदवार किमान 50 वर्षे आणि महिला उमेदवारांसाठी किमान 40 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच शासनाने निश्चित केलेल्या सर्व अटी व प्रमाणपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली कार्यालयात उपलब्ध आहे. इच्छुक व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली कार्यालयात 15 मार्चपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत.
हेही वाचा: शिराळ्यात सरपंचांच्या पतीवर डेअरीत घुसून हल्ला; लोखंडी गजाने डोक्यात वार, राणीहार व 90 हजार रोख रक्कम गायब.
- इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू
- सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत
- आखाती देशांतील तणाव; सांगलीत नियंत्रण कक्ष सुरू, हेल्पलाईन क्रमांक जाहीर
- सांगली जिल्ह्यातील समाजसेवकांसाठी मोठी संधी; राज्यातील 7 प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी 15 मार्चपर्यंत अर्ज करता येणार
- शिराळ्यात सरपंचांच्या पतीवर डेअरीत घुसून हल्ला; लोखंडी गजाने डोक्यात वार, राणीहार व 90 हजार रोख रक्कम गायब
- सांगली–मिरजमध्ये माजी सैनिकांसाठी सुरक्षा रक्षक भरती; 12 मार्च शेवटची तारीख









