सांगली : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. आखाती किंवा पश्चिम आशियाई देशांत वास्तव्यास असलेल्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती हवी असल्यास नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाने मंत्रालय, मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी (EOC) समन्वय साधला असून, प्राप्त चौकशी मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर मिळालेली माहिती संबंधित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक:
- जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली : 0233-2600500
- सांगली पोलीस नियंत्रण कक्ष : 0233-2672100
- मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई : 9321587143
आखाती देशांमध्ये नातेवाईक असलेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










