सांगली : जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 26 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत विजयनगर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत होणार आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित या मेळाव्यात शासनाच्या विविध रोजगार, स्वयंरोजगार व कर्ज योजनांची माहिती दिली जाणार आहे. उपस्थित उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यांनुसार वैयक्तिक मार्गदर्शनही केले जाणार आहे.
उद्योजकता योजनांबाबत जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जाईल. तसेच विविध कर्ज योजना, अर्थसहाय्य आणि रोजगार नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
जिल्ह्यातील इच्छुक तृतीयपंथीय उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा,
हेही वाचा: पैशांवरून वाद; बापाच्या खुनाप्रकरणी मुलाला आजन्म कारावास.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









